Home महाराष्ट्र पूजा खेडकर प्रकरण, सखोल चौकशी करायची असेल, तर कठोर प्रश्न विचारणे गरजेचे आहे.

पूजा खेडकर प्रकरण, सखोल चौकशी करायची असेल, तर कठोर प्रश्न विचारणे गरजेचे आहे.

6 second read
Comments Off on पूजा खेडकर प्रकरण, सखोल चौकशी करायची असेल, तर कठोर प्रश्न विचारणे गरजेचे आहे.
0
10

खोट्या प्रमाणपत्रांवर IAS अधिकारी बनलेल्या पूजा खेडकर यांच्या प्रकरणाने देशभर खळबळ उडवली आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या फसवणुकीचा संशय आहे. दिल्ली पोलिसांना जर सखोल चौकशी करायची असेल, तर खालील प्रश्न विचारणे गरजेचे आहे.

अपंगत्व प्रमाणपत्राची सत्यता


सर्वप्रथम विचारले पाहिजे की, पूजा खेडकरने अपंगत्व प्रमाणपत्र कोणत्या वैद्यकीय आधारावर घेतले? कोणत्या डॉक्टरांनी किंवा मेडिकल बोर्डने हे प्रमाणपत्र दिले? आणि त्या वेळी आवश्यक वैद्यकीय तपासणी झाली होती का? विशेष म्हणजे, हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पैसे किंवा राजकीय ओळखींचा वापर झाला का?

EWS प्रमाणपत्राचा गैरवापर


पूजा खेडकरने EWS म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र कशाच्या आधारे घेतले? त्यावेळी तिच्या कुटुंबाची वास्तविक उत्पन्न स्थिती काय होती? प्रमाणपत्र देताना उत्पन्नाचे योग्य पुरावे तपासले गेले का? आणि महागड्या कार, स्थावर मालमत्ता, आणि वडिलांचे उच्च पद असतानाही त्या EWS साठी पात्र कशा ठरल्या?

जात प्रमाणपत्र प्रश्न


तिचे जात प्रमाणपत्र कोणत्या अधिकाऱ्यांनी दिले आणि कोणत्या आधारावर? शिक्षण किंवा UPSC दरम्यान ते कधी सत्यापित झाले का? त्यांनी शाळा, महाविद्यालय आणि UPSC अशा अनेक टप्प्यांवर जातीचा लाभ घेतला का?

UPSC अर्जातील विसंगती


UPSC अर्ज करताना काही माहिती लपवली गेली होती का? तिने दिलेली कागदपत्रे खरी होती का? यामध्ये काही विसंगती किंवा मुद्दाम दिलेली चुकीची माहिती होती का? यामागे कोणत्याही अधिकाऱ्यांचा हात होता का?

सेवा प्रवेश आणि नियुक्ती


वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांनी हरकत घेतली असतानाही तिची नियुक्ती कशी झाली? तिने नियुक्तीपूर्वी सरकारी गाडी व ऑफिसची मागणी का केली? हे सर्व कोणी मंजूर केले? महाराष्ट्र सरकारमधून कोणी यामध्ये तिला मदत केली होती का?

फसवणुकीचे जाळे


बनावट प्रमाणपत्र तयार करताना आणखी कोण सहभागी होते? कोणते दलाल, राजकारणी किंवा अधिकारी यामध्ये सामील होते का? अशाच प्रकारे फसवणूक करून इतर कोणी सेवेत आले आहेत का?

निष्कर्ष


पूजा खेडकर प्रकरण ही केवळ एक व्यक्तीची फसवणूक नाही. ही संपूर्ण यंत्रणेतील सडलेल्या भागाची झलक आहे. दिल्ली पोलिसांनी यातील प्रत्येक टप्प्यावर चौकशी केली पाहिजे. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

ह्या प्रकरणाकडे केवळ चर्चेच्या दृष्टीने नव्हे, तर कारवाईच्या दिशेने पाहणे आवश्यक आहे.
कारण इथे देशाच्या लोकशाही आणि व्यवस्थेची विश्वासार्हता पणाला लागली आहे.

Load More Related Articles
Load More By VIJAY KUMBHAR
Load More In महाराष्ट्र
Comments are closed.

Check Also

महाराष्ट्रात यंदा सर्वात लवकर मान्सून! १९९० नंतरची ऐतिहासिक नोंद

महाराष्ट्रात यंदा पावसाळ्याने सर्वांच्या अपेक्षेपेक्षा आधी म्हणजेच २५ मे २०२५ रोजीच हजेरी …