
पुणे | ७ मे २०२५ – माहिती अधिकार कायद्याच्या सद्यस्थितीवर सध्या व्यापक चर्चा सुरु आहे. काहीजण म्हणतात की हा कायदा आता मृतवत झाला आहे, तर काहींच्या मते याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरं मिळवण्यासाठी आणि या कायद्याची खरी स्थिती समजून घेण्यासाठी, या रविवारी “माहिती अधिकार कट्टा” या व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त श्री. राहुल पांडे यांच्याशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.
आपल्याकडे RTI संदर्भातील अनुभव, शंका, सूचना किंवा तक्रारी असतील, तर खालील लिंकवर नोंदणी करून त्या आमच्यापर्यंत पोहोचवा:
नोंदणी लिंक – https://forms.gle/zcXbuQuGsvxBEf716
नोंदणी केलेल्यांना या लिंकवरूनच ऑनलाइन संवादाची लिंक पाठवण्यात येईल.
हा संवाद खुला, पारदर्शक आणि जाणीवपूर्वक RTI च्या वापराबाबत जागरुकता निर्माण करणारा असणार आहे.
RTI कायद्याला बळकटी देण्यासाठी आपला सहभाग महत्त्वाचा आहे.