Home देश विदेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पूजा खेडकर उद्या २ मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर होणार,परंतु सत्य बाहेर येणार का?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पूजा खेडकर उद्या २ मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर होणार,परंतु सत्य बाहेर येणार का?

3 second read
Comments Off on सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पूजा खेडकर उद्या २ मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर होणार,परंतु सत्य बाहेर येणार का?
0
15

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पुजा खेडकर २ मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर होणार आहे. आता खरा प्रश्न आहे तो प्रमाणपत्रांच्या घोटाळ्याचा जी तिने यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी वापरली, ती उघड करण्याचा. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग प्रमाणपत्र (EWS), जात प्रमाणपत्र इत्यादींचा समावेश आहे. तसेच, ही प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी किंवा मिळण्यासाठी तिला कोणी कोणी मदत मदत केली, हे उघड करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये फक्त तिला दोषी ठरवणे पुरेसे ठरणार नाही तर तपासणीत पुढील बाबी देखील समोर येणे आवश्यक आहे:

  • तिला बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात कोणी मदत केली?
  • कोणत्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याकडे आणि जबाबदारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले?
  • हे संगनमत किंवा कटकारस्थान किती खोलवर पोहोचलेले आहे.

पूजा खेडकरला दिल्ली पोलिसांनी कठीण आणि थेट प्रश्न विचारावेत हे खरे असले तरी विचार केला तर: अटक न करता तिच्याकडून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवता येतील का?

दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा


१. तिने दिव्यांग प्रमाणपत्र कोणत्या वैद्यकीय कारणावरून घेतले?
२. हे प्रमाणपत्र कोणत्या डॉक्टर किंवा वैद्यकीय बोर्डाने दिले आणि वैद्यकीय तपासणी खरंच झाली का?
३. हे प्रमाणपत्र मंजूर करण्यासाठी कोणती लाच किंवा दबाव वापरण्यात आला का?

EWS (आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग) प्रमाणपत्र


४. EWS प्रमाणपत्र घेण्याच्या वेळी तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न आणि मालमत्तेची स्थिती काय होती?
५. हे प्रमाणपत्र कोणत्या अधिकाऱ्याने जारी केले ? उत्पन्नाचे पुरावे तपासले गेले का?
६. तुम्ही प्रचंड मालमत्ता (उदा. स्थावर मालमत्ता, पालकांचे उत्पन्न, Audi कार) असतानाही EWS मध्ये कसेपात्र ठरलात?

जातीचे प्रमाणपत्र


७. तुमचे जातीचे प्रमाणपत्र कोणत्या प्राधिकरणाने जारी केले आणि त्याचा आधार काय होता?
८. तुम्ही शिक्षण घेत असताना किंवा यूपीएससी प्रक्रियेदरम्यान तुमच्या जातीची स्थिती तपासली गेली का किंवा त्याबाबात शंका व्यक्त करण्यात आली का?
९. तुम्ही अनेक ठिकाणी, शाळा, कॉलेज, आणि यूपीएससी मध्ये जातीचे लाभ वापरले का?

यूपीएससी अर्ज प्रक्रिया


१०. तुम्ही यूपीएससी अर्जात कोणती माहिती लपवली किंवा बनावटगिरी केली का?
११. तुम्ही यूपीएससीला सादर केलेल्या दस्तऐवजांमध्ये कोणत्याही प्रकारची विसंगती होती का?
१२. यूपीएससी किंवा इतर सरकारी अधिकाऱ्यानी तुम्हाला अर्ज स्वीकृत करण्यासाठी किंवा गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मदत केली का?

सिव्हिल सेवा प्रवेश प्रक्रिया


१३. गंभीर तृटी असतानाही तुम्हाला पोस्टिंग कशी मिळाली ?
१४. औपचारिक नियुक्तीपूर्वी तुम्ही सरकारची कार, ऑफिस स्पेस अशा कोणती सोयी मागितल्या?
१५. महाराष्ट्र सरकारमधील कोणत्या अधिकाऱ्यांनी तुमच्या नियुक्तीला मदत केली किंवा ती वेगाने पूर्ण केली?

कट कारस्थान्यांचे जाळे


१६. बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात किंवा सत्यापित करण्यात आणखी कोणते लोक सामील होते?
१७. दलाल, राजकारणी, किंवा प्रशासकीय अधिकारी हे तुमच्या सिव्हिल सेवा प्रवेशासाठी मदत करत होते का?
१८. इतर कोणत्या स्पर्धकांनी अशाच प्रकारे बनावट प्रमाणपत्रांचा वापर केला हे तुम्हाला माहित आहे का?

या तपासात अनेक विसंगती आणि धोरणांमधील त्रुटी उघड होऊ शकतात. यामुळे केवळ पुजा खेड़कऱला नाही, तर संपूर्ण प्रणालीला उत्तरदायी ठरवणे आवश्यक आहे.

Load More Related Articles
Load More By VIJAY KUMBHAR
Load More In देश विदेश
Comments are closed.

Check Also

महाराष्ट्रात यंदा सर्वात लवकर मान्सून! १९९० नंतरची ऐतिहासिक नोंद

महाराष्ट्रात यंदा पावसाळ्याने सर्वांच्या अपेक्षेपेक्षा आधी म्हणजेच २५ मे २०२५ रोजीच हजेरी …