नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने आपल्या संघटनात्मक विस्ताराच्या अनुषंगाने देशभरातील विविध राज्यांमध्ये प्रभारींची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रभारी म्हणून प्रकाश जरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकाश जरवाल हे दिल्लीतील देवली विधानसभा मतदारसंघाचे आम आदमी पार्टीचे माजी आमदार असून त्यांनी 2013 मध्ये अवघ्या 25 व्या वर्षी निवडणूक जिंकून मोठी घवघवीत कामगिरी केली होती. त्यांनी अनेक वर्षे देवली मतदारसंघाचे …