Home Breaking News प्रकाश जरवाल आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त

प्रकाश जरवाल आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त

0 second read
Comments Off on प्रकाश जरवाल आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त
0
42
Prakash Jarwal

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने आपल्या संघटनात्मक विस्ताराच्या अनुषंगाने देशभरातील विविध राज्यांमध्ये प्रभारींची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रभारी म्हणून प्रकाश जरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रकाश जरवाल हे दिल्लीतील देवली विधानसभा मतदारसंघाचे आम आदमी पार्टीचे माजी आमदार असून त्यांनी 2013 मध्ये अवघ्या 25 व्या वर्षी निवडणूक जिंकून मोठी घवघवीत कामगिरी केली होती. त्यांनी अनेक वर्षे देवली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून, दिल्ली जल बोर्डाचे सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

पक्षाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि लडाख या राज्यांसाठीही नव्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Load More Related Articles
Load More By VIJAY KUMBHAR
Load More In Breaking News
Comments are closed.

Check Also

मरणासन्न माहिती अधिकार कायद्यावर आणखी मोठ्या हल्ल्याची शिफारस….

माहितीचा अधिकार कायदा, २००५ हा भारतातील लोकशाही व्यवस्थेतील केवळ एक कायदा नाही, तर तो नागर…