मुंबई, ७ मे २०२५ —अनियमिततेचे अनेक आरोप अनेक असतानाही, महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुमीत SSG BVG महाराष्ट्र EMS प्रा. लि. या कंपनीसोबत १० वर्षांचा महत्त्वाकांक्षी करार केला आहे. या कराराअंतर्गत राज्यभरात नवीन ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ (MEMS) १०८ अॅम्ब्युलन्स प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. एकूण अंदाजे १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रात …