देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी स्वतःच्या घराच्या स्वप्नासाठी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी झाले. “महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी” हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नव्हता, तो राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानाने स्वतःचे घर मिळावे, या भावनेतून उभा राहिलेला विश्वासाचा प्रकल्प होता. मात्र जवळपास सतरा वर्षांनंतरही हजारो कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आज सर्वात मोठा प्रश्न …