मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने त्यासाठी आवश्यक असलेल्या 132 KV वीजवाहिनीच्या उभारणीस परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण संरक्षणाच्या कारभारावर अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा निर्णय केवळ 847 कांदळवन आणि 196 इतर झाडे तोडण्यापुरता मर्यादित नाही, तो सरकारच्या पर्यावरणीय जबाबदारीच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे करतो. (मुंबई-अहमदाबाद बुलेट …